पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस घेतल्याचं कौतुक, जनतेला लसीवर विश्वास निर्माण होण्यास मदत - संजय राऊत
Continues below advertisement
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात लस देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.पंतप्रधान मोदी यांनी भारत बायोटेकची को-वॅक्सिन लस घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 6 च्या सुमारास दिल्लीतील एम्स रूग्णालयात पोहचले. तिथे त्यांनी कोरोनाची लस टोचून घेतली. देशभरात आजपासून कोरोना लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात 60 वर्षापुढील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे आणि 45 वर्षापुढील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय 71 वर्षे आहे.
Continues below advertisement
Tags :
AIIMS Delhi PM Modi Vaccination MP Sanjay Raut Aiims Sanjay Raut Corona Vaccine Corona Vaccination PM Modi