#SanjayRathod पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी - संजय राठोड
पुणे : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्यात वादंग उठलं आहे. या घटनेला आज 21 दिवस उलटून गेले आहेत. काल शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणात राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. काल या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई चव्हाण यांचा गुन्हा काल पुण्यातील वानवडी पोलिसांनी दाखल करुन घेतला नाही.