Sanitizer Death | कोल्हापूरमध्ये सॅनिटायझरची बाटली असलेला कचरा जाळताना स्फोट, महिलेचा होरपळून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोल्हापूर : कोरोनाव्हायरसने धडक दिल्यापासून सॅनिटायझरची बातमी आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनली आहे. मात्र सॅनिटायझर संपल्यानंतर त्या बाटलीची विल्हेवाट लावताना थोडी काळजी घ्या. कारण सॅनिटायझरची बाटली असलेला कचरा जाळताना स्फोट होऊन एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोल्हापुरातील बोरवडे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. सुनीता काशिद असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे.