Sangmeshwer Mountain Excavation | नियम धाब्यावर बसवत उत्खनन, रत्नागिरीच्या संगमेश्वरला पुराचा धोका
Continues below advertisement
: लॉकडाऊनच्या काळात काहींनी आपलं उखळ पांढरं करून घेतल्याचा प्रकार रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे समोर आला आहे. संगमेश्वर बाजारपेठेला लागून असलेल्या छोट्या डोंगरावर अवैधरित्या उत्खनन केले. त्यानंतर यातील शेकडो ट्रक माती ही जवळच्या नदीपात्रात देखील टाकण्यात आली. परिणामी आता संगमेश्वर बाजारपेठेला आता पुराचा धोका देखील निर्माण झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात सारे व्यवहार, कामे बंद होती. अशावेळी देखील राजरोसपणे अशा प्रकारचे उत्खनन सुरु कसे होते? यावर देखील शंका उपस्थित केली जात आहे.
Continues below advertisement