Vishwajeet Kadam Full Speech : Sangli सोडणं चूक, कारस्थान करणाऱ्यांचा वचपा काढणार, आक्रमक भाषण

Continues below advertisement

सांगली : सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्यासाठी प्रयत्नांची शर्थ करूनही निराशा हाती आलेल्या आमदार विश्वजित कदम यांनी काँग्रेस मेळाव्यातून भूमिका स्पष्ट केली. गेल्या पाच वर्षांपासून अनेक आक्रमणे आमच्यावर झाली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे आम्ही टिकून राहिलो. जिल्ह्यात 200 किलोमीटर आम्ही जनसंवाद पदयात्रा काढली. काँगेसची जागा ही काँग्रेसला मिळाली पाहिजे हा आग्रह होता. आमच्यात गटबाजी होती, पण यावेळी आम्ही गटबाजीला पूर्णविराम दिला. एकच काँगेस पक्ष हा एकच गट आहे. मलाही सतत लोकसभा लढवण्याचे आवाहन करण्यात आले.2019 मध्ये मी विधानसभा लढवण्यावर ठाम राहिलो. कारण पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचे नव्हते. एका तरुण सहकाऱ्याला तयार करून मी लोकसभेसाठी एकजण तयार केले, नाव देखील लोकसभेसाठी पाठवल्याचे ते म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram