Vishal Patil : विशाल पाटील सांगलीत आपली भूमिका मांडणार
abp majha web team
Updated at:
06 Apr 2024 04:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVishal Patil : विशाल पाटील सांगलीत आपली भूमिका मांडणार महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा तिढा काही सुटत नाहीये. त्यात आता संजय राऊतांनी थेट विशाल पाटलांच्या हेतूवरच शंका घेतलीये. विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी वेगळं आहे, त्यांचं विमान फक्त गुजरातमध्ये उतरू नये एवढीच आमची इच्छा आहे असं राऊत म्हणाले. राऊतांच्या या आरोपाचा विश्वजीत कदम यांनी चांगलाच समाचार घेतला. धाडस असेल तर राऊतांनी नाव घेऊन बोलावं, आम्ही खूप संयमानं बोलत आहोत, पण संयमाची परीक्षा बघू नका, अशा शब्दांत कदम यांनी राऊतांना ठणकावलं आहे.