Sangli:परतीच्या पावसाचा काळू बाळूसह अनेक तमाशा फडाला फटका, विदर्भ, खान्देशातील प्रयोग पावसामुळे ठप्प

Continues below advertisement

संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसानं हाहाकार उडवून दिला. पावसानं जाता जाता शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. एकीकडं राज्यभरातील शेतकरी परतीच्या पावसानं बेजार झाला, मात्र या परतीच्या पावसाचा फटका लोककलावंतांनाही बसलाय. आहे. परतीच्या पावसाचा फटका काळू-बाळूच्या फडासह अनेक तमाशाच्या फडांना बसलाय. विदर्भ, खान्देशातील अनेक प्रयोग ठप्प झालेत. उभ्या महाराष्ट्राला वेड लावलेले आणि तमाशा कलाप्रकारावर हुकूमत गाजविणारे सांगली जिल्ह्यातील कवलापूर इथले 'काळू-बाळू'चे मोठे तमाशे तात्पुरते बंद पडलेत.परतीचा पाऊस. दोन वर्ष कोरोनामुळं प्रेक्षकांनी फडाकडे पाठ फिरवली होती. त्यातच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे हे तमाशा फड आर्थिक संकटात सापडले होते. एकीकडे आधीपासूनच कोरोना आणि इतर कारणांमुळे तमाशा बंद असल्यानं उपासमार आणि आर्थिक चणचण सुरू आहे. तर दुसरीकडे यंदा परतीच्या पावसामुळे विदर्भ, खान्देशात तमाशाचे प्रयोग ठप्प आहेत. आता जानेवारीतच तमाशाचे फड बाहेर पडणार आहेत... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram