Turmeric Price | सांगलीत हळदीला सुवर्ण झळाळी, राजापुरी हळदीला प्रतिक्विंटल 30 हजारांचा भाव
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला आताच्या हंगामात सोन्याचा भाव मिळताना दिसत आहे. हळदीच्या सौद्यात राजापुरी हळदीस ऐतिहासिक 30 हजार प्रति क्विंटल पर्यंत दर मिळाला आहे. बाजार समिती स्थापन झाल्यापासूनचा हा ऐतिहासिक दर राहिला आहे. त्यामुळे शेतकरी, हळद व्यापाऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदा हळदीची वाढती मागणी, कोरोनामुळे हळदीचे वाढलेले महत्व यामुळे देशांतर्गत आणि परदेशात देखील मोठ्या प्रमाणावर हळद निर्यात होत आहे. यामुळे खऱ्या अर्थाने हळदीला सोन्याची झळाळी आलीय.