Sangli NET Exam : विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उलटे कपडे सांगितल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडून दखल
Continues below advertisement
सांगलीत नीट परीक्षेदरम्यान एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार घडलाय. परीक्षार्थींना त्यांच्या अंगावरील कपडे उलटे परिधान करायला लावून परीक्षा देण्यास लावले. पालकांनी या संतापजनक प्रकारावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे केली तक्रार केलीय. याची दखल आता राज्य महिला आयोगाने घेतली असून वैद्यकीय शिक्षण संचालकांना याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. देशभरात ही परीक्षा 7 मे रोजी झाली. सांगली शहरातील कस्तुरबा वालचंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना कपडे उलटे परिधान करायला लावले... परीक्षा संपल्यानंतर बाहेर आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या अंगावरील कपडे उलटे पाहून पालकांना याबाबत प्रश्न पडला होता. तेव्हा हा प्रकार समोर आला...
Continues below advertisement
Tags :
Sangli Rupali Chakankar National Testing Agency 'Maharashtra Net Exam State Commissions For Women