Sanjay kaka Patil on Vishal Patil : यंदा विशाल पाटलांचा पराभव करुन हॅटट्रिक करणार

सांगलीतील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना आव्हान दिलं आहे. एकदा तुमच्या भावात, २०१९ मध्ये तुमचा आणि यंदाही मोठ्या फरकाने तुमचा पराभव करुन हॅटट्रिक करणार, असं संजयकाका पाटील म्हणाले. मैदान सोडून पळ काढू नको, असं आव्हान मी विशाल पाटील यांना आधीच दिलंय.  आता विशाल पुन्हा मैदानात आले आहेत. आत्ता कुठे सुरुवात झालीय, खरा पिक्चर चार दिवसात सुरु होईल, असं संजयकाका म्हणाले.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola