
Sangli : 'मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय...' सांगलीत सरपंच साहेबांचा होणार शपथविधी
Continues below advertisement
सरपंचपदाचे वाढलेले अधिकार पाहून यंदाची निवडणूक चुरशीची झाली. आता जे सरपंच म्हणून निवडून आलेत त्यातील काहीजणांना गावचा मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय. कारण, सांगलीच्या तासगावजवळ वंजारवाडी गावच्या सरपंच पदावर विराजमान झालेल्या अरुण खरमाटे यांनी एक आगळा-वेगळा कार्यक्रम आयोजित केलाय.त्यांनी चक्क सरपंच पदाचा पदभार आणि शपथविधी सोहळा गावात आयोजित केलाय. यासाठी त्यांनी जसे मुख्यमंत्री पदाचे शपथविधी सोहळे पार पडतात तसेच सरपंच पदाच्या पदभार आणि शपथविधी सोहळ्याचे नियोजन केलेय. बीडीओच्या उपस्थितीत ते शपथ घेणार आहेत. यात आपल्या कर्तव्याची शपथ घेऊनच ते कार्यभार स्वीकारणार आहेत...
Continues below advertisement