Sangli Statue : एक पुतळा दोन रुपात, खानापूरमध्ये एकात पुतळ्यात जवान - शेतकऱ्यांचा सन्मान
Continues below advertisement
'जय जवान , जय किसान' हा नारा खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरण्याचं काम सांगलीतल्या खानापूरमधील ग्रामस्थांनी केलंय... खंबाळे गावातील नागरिकांनी एक पुतळा बनवलाय जो शेतकरी आणि जवान यांचा एकत्रित सन्मान करणारा आहे. या पुतळ्यासमोर 26 /11 मध्ये शहीद झालेल्या पोलिसांचे फोटो लावण्यात आलेत... गावातील तरुणांना सैन्य दलामध्ये भरती होण्याची प्रेरणा मिळावी तसंच तरुणाईने कृषी क्षेत्राकडे वळावं या उद्देशानेच या पुतळ्याची उभारणी करण्यात आलीेय.. आमदार अनिल बाबर, सरपंच आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
Continues below advertisement