Nutritious Food Pregnant Women : गर्भवती माता पोषण आहारात साप; सखोल चौकशीची मागणी
Nutritious Food Pregnant Women : गर्भवती माता पोषण आहारात साप; सखोल चौकशीची मागणी महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता यांना दिलेल्या आहारात चक्क मृत सापाचे किरडू आढळल्याची घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील पळूस तालुक्यात हा प्रकार उघडकीस आलाय. पलूस परिसरातील लाभार्थी पालक व अंगणवाडी सेविकात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्ष लहान बालकांना पोषण आहार गेली अनेक वर्षे पुरवला जातो. यामध्ये या अगोदर हरभरा तांदूळ,तूरडाळ,गहू, तिखट,मीठ विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या. नुकताच एप्रिल व मे महिन्याचा पोषण आहार पलूस येथील केंद्रावर पोहोच करण्यात आला. तो तत्परतेने संबधित लाभार्थ्यांना संपर्क करून आहार घेऊन जाण्यास सांगितले. पॅकींग फोडली असता त्या पिशवीत चक्क लहान आकाराचा मृत अवस्थेतील साप आढळला काही लाभार्थ्यांनी सादर आहार घरी घेऊन गेल्यावर येथील कृषिनगर अंगणवाडी क्रमांक 116 येथून येथील लाभार्थी माझी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष याच्या साठी आहार घरी नेला व तो पॅकींग फोडला असता त्या पिशवीत चक्क लहान आकाराचा मृत अवस्थेतील साप आढळला. त्यांनी तत्काळ संबधित अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधला. संबधित अंगणवाडी सेविका यांनी वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले यांच्याशी संपर्क साधला व ही बाब निदर्शनास आणून दिली.