Sangli Rain Update : सांगलीमधील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ ,कृष्णा नदीची पाणी पातळी 27 फुटांवर
सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय... कोयना धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्याने कृष्णेची पातळी वाढतेय.. कृष्णेची पातळी २७ फुटांवर गेलीय.. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.. नदीकाठी राहणाऱ्या ग्रामस्थांचं स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्यात. याच पार्श्वभूमीवर एनडीआरएफची पथकंही या ठिकाणी दाखल झालीत...