Sangli Jat Water Issue : पाणी द्याचचं नसेल तर कर्नाटकात जाऊद्या, जतमधील नागरिकांची मागणी

Continues below advertisement

Sangli Jat Water Issue : पाणी द्याचचं नसेल तर कर्नाटकात जाऊद्या, जतमधील नागरिकांची मागणी

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून जत तालुक्याची ओळख आहे. यंदा जुलै महिना संपत आला तरी पाऊसाने हजेरी लावली नाही,त्यामुळे यावर्षी तालुक्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्याच्या आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाऊसाअभावि खरिपाच्या पेरण्या जवळपास  वाया गेल्या आहेत.तर  पाण्याची टँकरची मागणी आता गावागावातून वाढू लागली आहे. मात्र प्रशासनाकडून राज्य सरकारकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत  जत तालुक्यातल्या 65 गावांनी दुष्काळी तालुक्याच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले आहे. .राज्य सरकारकडून जर पाणी देता येत नसेल,दुष्काळ जाहीर करता येत नसेल,तर आता आम्हाला कर्नाटक मध्ये जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी पुन्हा एकदा दुष्काळग्रस्तांनी मागणी केली आहे.कर्नाटक सरकारकडून तुबची बबलेश्वरच्या माध्यमातून जतच्या दुष्काळी 65 गावांना पाणी तातडीने मिळू शकतं, मात्र या बाबतीत राज्य सरकार चाल-ढकल करत आहे. याशिवाय विस्तारित म्हैशाळ योजनेला निधी मंजूर करून केवळ गाजर दाखवण्याचा उद्योग करण्यात आल्याचा आरोप देखील दुष्काळग्रस्तांनी केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram