Sangli Jat Nagarsevak Vijay Tad : सांगलीतील जतमध्ये नगरसेवक विजय ताड यांची भरदिवसा हत्या

Continues below advertisement

Sangli Jat Nagarsevak Vijay Tad : सांगलीतील जतमध्ये नगरसेवक विजय ताड यांची भरदिवसा हत्या

सांगलीच्या जत मध्ये भाजपा नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे,विजय ताड,असे भाजपा नगरसेवकाचे नाव आहे.ताड यांची ईनोवा गाडी अडवून अज्ञातांनी गाडीवर हल्ला चढवत ताड यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत.जत मधल्या सांगोला रोडवरील अल्फोंसो स्कूल जवळ भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. नगरसेवक ताड हे आपल्या इनोव्हा गाडीतून सांगोला रोडवरील असणाऱ्या स्कूल या ठिकाणी आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले होते. अल्फान्सो स्कूलच्या जवळ पोहोचले असता ताड यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी ताडे यांची ईनोवा गाडी अडवली आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करत ताड यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या आहेत ज्यामध्ये जागीच ठार झाले आहेत.या घटनेमुळे जत शहरासह जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.मात्र हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून आणि कोडी केला आहे हे मात्र समजू शकले नाही,या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे. तसेच ताड समर्थकांनी या ठिकाणी मोठे गर्दी केली आहे,तर घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली देखील जतकडे रवाना झाले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram