Sangli Halad :हळद सौदयात राजापुरी हळदीला 17 हजार एक रुपया इतका उच्चांकी दर
सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हळद आणि गुळ सौदे पार पडले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते यावेळी हळद आणि गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ झाला .गुळाला 4 हजार 500 रुपये क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला तर हळद सौदयात राजापुरी हळदीला 17 हजार एक रुपया इतका उच्चांकी दर मिळाला आहे. यंदाच्या वर्षी देशभरात हळदीची लागवड कमी प्रमाणात झाल्याने पुढील हंगामात हळदीला सोन्याची झळाळी येईल,असा विश्वास सौदाच्या निमित्ताने व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.