Sangli Rain Update : सांगली जिल्ह्यावरही दुष्काळचं सावट, पिकांची वाढही खुंटली : ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Aug 2023 09:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगली जिल्ह्यावरही दुष्काळचं सावट आहे. खानापूर, आटपाडी भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने या भागात दुष्काळी परिस्थिती जाणवू लागलीय. एकीकडे पाऊस न पडल्यानं पिकांची वाढ खुंटलीय. तर दुसरीकडे तलाव देखील कोरडे पडू लागलेत. सांगली जिल्ह्यात लहान- मोठे ८३ तलाव असून, त्यापैकी २६ तलाव कोरडे पडले आहेत. १५ तलावांमध्ये मृतपाणीसाठा जमा आहे. तर १९ पाझर तलावांमध्ये केवळ २५ टक्के आणि ११ तलावांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे.