Sangali Cafe Todfod Special Report : कॅफे संस्कृती, वाढतेय विकृती! कॅफेमधले काळे धंदे कधी थांबणार?
कॅफे म्हणजे मीटिंग पॉईंट... तरुणाईमध्ये तर या कॅफे पॉईंटची क्रेझ असतेच असते.. पण हेच कॅफे सध्या अश्लील चाळ्यांचे, अत्याचारांचे अड्डे बनू लागलेत.. सांगलीत तर अल्पवयीन मुलीवर अशाच कॅफेमध्ये अत्याचाराची धक्कादायक घटना घडलीय.. त्यांनतर हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे कॅफेमध्ये गैरप्रकार होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. यानंतर संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफेची तोडफोड करायला सुरुवात केली. या प्रकरणाची आता संपूर्ण शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. कॅफेमध्ये गैरप्रकार घडत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून कॅफेची तोडफोड करण्यात येत आहे. सांगलीतील कॅफे हंग ऑन असे कॅफेत गुंगीचे औषध देऊन अत्याचाराची घटना घडली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली. आज या घटनेचे पडसाद उमटले आहेत. संतप्त शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी आज आक्रमक घेतला आहे. आज शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी तीन कॅफेची तोडफोड केली आहे.
कॅफेच्या अशाच काळ्या काचांमागील काळ्या धंद्यांवर, प्रकाश टाकणारा हा खास रिपोर्ट पाहूया...