Raju Shetti on District Bank: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याची चौकशी करा- राजू शेट्टी

Continues below advertisement

मागील काही वर्षे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक अनेक घोटाळ्याने गाजत आहेत. त्यातच भर म्हणून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शासन निधीवर दरोडा घालून कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार घडला आहे.  यापूर्वी घडलेल्या घोटाळ्यांची निपक्षपातीपणे चौकशी होऊन दोषींच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार आयुक्त दीपक तावरेसो यांना पत्राद्वारे राजू शेट्टी यांनी केली आहे.  बँकेच्या कामकाजात अनियमितता असून अनेक घोटाळे झालेले आहेत. याबाबत शासनाकडे लेखी तक्रार केली आहे मात्र शासनाकडून कोणतीच कारवाई केली गेलेली नाही.बँकेच्या संचालक मंडळाने व अधिकाऱ्यांनी केलेल्या कारनाम्यावर पांघरून घालण्याचे काम शासनच करत असल्याचे दिसून येऊ लागले आहे . याआधी जिल्ह्यातील अनेक संघटना व सामाजिक संस्थांनीही याबाबत तक्रारी केल्या मात्र त्याची काहीच चौकशी न झाल्याने बँकेचे संचालक मंडळ व अधिकाऱ्यांमध्ये घोटाळे करण्याचे धाडस वाढू लागले आहे.

सध्या झालेल्या घोटाळ्यामध्ये सोनेतारण, ठेवीवरील व्याजासह,दुष्काळ,अतिवृष्ट,अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे शासनाकडून जमा झाल्यानंतर बोगस खाती काढून पैसे परस्पर काढण्यात आलेले आहेत. सध्याचा झालेला  घोटाळा सहा शाखांमध्ये झालेला असून यामध्ये बँकेने बोगस ताळेबंद दाखविले असल्याचे समजते. शेतकऱ्यांची लाईफ लाईन म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकांच्याकडे पहिले जाते परंतु सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तासगाव,निमणी,सिद्धेवाडी,हातनूर,नेलकरंजी,बसर्गी या सहा शाखांमध्ये शासन निधीत दोन कोटी 43 लाख रुपयाचा अपहार प्रथमदर्शनी दिसून येत आहे.  हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये बँकेने आतापर्यंत पाच जणांचे निलंबन केलेले आहे. परंतु निलंबन न करता त्यांना कायमस्वरूपी नोकरीतून बडतर्फ करून अपहार केलेली रक्कम व्याजासहित वसूल करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram