Peacock Dancing Sangli : कृष्णा नदीकाठी मोराच्या नृत्याचं विलोभनीय दृश्य

Continues below advertisement

Peacock Dancing Sangli : कृष्णा नदीकाठी मोराच्या नृत्याचं विलोभनीय दृश्य  महाराष्ट्रात वळीव पावसाने दमदार  हजेरी लावली असतांना मोरांना त्यांच्या विणीच्या हंगामाची आठवण करून दिली आहे. पावसाच्या सुरुवातीला मोरांच्या विणीचा हंगाम असतो. साधारणपणे मे महिन्यापासून ते जून अखेरीपर्यंत लांबलचक पिसारा असणारे व पिसारा फुलवून नाचणारे मोर ब झाडीच्या आसपास दिसू लागतात. मोर मादीला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवून नृत्य करीत असतात. पलूस तालुक्यातील बुर्ली- आमणापूर कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या बंचाप्पा बन परिसरात मोराच्या नृत्याचे विलोभनीय दृश्य टिपलेय पक्षीप्रेमी, संदीप नाझरे यांनी.
  पाऊस, मोर यांचं नातं वेगळंच असतं. पहाटे वळीवाच्या सरी कोसळून गेल्यानंतर मोर जास्त खुशीत दिसतात. पिसारा फुलवून थुईथुई नाचणारा मोर पाहण्याचा आनंद पावसामुळे मिळत आहे. सकाळपासून असंच चित्र बंचाप्पा बनात पहायला मिळत आहे. पिसारा फुलवून मोर नाचू लागलेत. भिजलेल्या पंखांचा पिसारा अधिकच खुलून दिसतो. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram