Nitesh Rane : सांगलीतील जनआक्रोश मोर्चात नितेश राणेंची पोलिसांना धमकी

Continues below advertisement

Nitesh Rane : सांगलीतील जनआक्रोश मोर्चात नितेश राणेंची पोलिसांना धमकी  सांगलीतील जनआक्रोश मोर्चात नितेश राणेंची पोलिसांना धमकी,अशा जिल्ह्यात बदली करु की फोनही लागणार नाही, राणेंचा पोलिसांना इशारा. लव्ह जिहादवर भाषण करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) थेट पोलिसांनाच धमकी दिली. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही असं ते म्हणाले. सांगलीच्या पलूस येथे आयोजित शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चा दरम्यान बोलताना नितेश राणेंनी हे वक्तव्य केलं.   लव्ह जिहाद वर बोलताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सांगलीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना भर सभेतून दम भरला. सरकार हिंदूचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तुम्हाला जर तुमच्या पोस्टवर मजा येत नसेल तर अशी काही मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यात घेऊन जाऊ की जिथून बायको फोनपण लागणार नाही अशा भाषेत नितेश राणेंनी पोलिसांना दम दिला.  मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत पण नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो.   अर्ध्या तासात तक्रार घ्यायची, अन्यथा धिंगाणा घालू  पलूस शहरामध्ये लव्ह जिहाद विरोधात भाजपचे खासदार अमर साबळे, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवशक्ती-भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आयोजित सभेतून बोलताना नितेश राणेंनी पोलिसांवर निशाणा साधला. पोलिस ठाण्यात लव्ह जिहाद बाबत तक्रार देण्यात येणाऱ्या मुलीची तक्रार अर्ध्या तासात घेतली पाहिजे, अन्यथा पुढच्या तीन तासात पोलिस ठाण्यात दाखल होऊन धिंगाणा घालू असा इशारा देखील नितेश राणे यांनी दिला आहे.  उरण आणि धारावी हत्याप्रकरणी पीडितांना न्याय मिळावा आणि दोषींना शिक्षा व्हावी यासाठी सांगलीमध्ये या जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं.   आमदार नितेश राणे यांनी याआधीही पोलिसांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पोलिस काय करणार आहेत, हे फक्त आमचे व्हिडीओ काढतील आणि घरात जाऊन बायकोला दाखवतील असं ते म्हणाले होते. तसेच आमचा बॉस सागर बंगल्यावर बसतो असंही ते म्हणाले होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram