Jayant Patil : राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना सरकारचा धक्का, सांगली जिल्हा बँक रडारवर
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत राज्य सरकारने आदेश दिलेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल तीन वेळा सहकार विभागाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराच्या चौकशीला स्थगिती देण्यात आली होती. आता याच गैरव्वहाराप्रकरणी राज्य सरकारने चौकशी करण्याचे आदेश दिल्यानं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना धक्का दिल्याचं बोललं जातंय. जयंत पाटील यांचे निकटवर्तीय दिलीप पाटील हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. बँकेतील नोकरभरती देखील दिलीप पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातच झाली. या नोकरभरतीत देखील मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यावेळी करण्यात आला.