Sangli पालिकेत चंद्रकांत पाटलांना जयंत पाटील यांचा धक्का; महापौर राष्ट्रवादीचा

सांगली महापालिकेत महाविकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. सांगली महापालिकेत सत्तांतर झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी सांगलीच्या महापौरपदी विराजमान झाले आहेत. तर विशाल पाटील गटाचे उमेश पाटील यांना उपमहापौरपद मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिला.

सांगली महापालिकेत मागील अडीच वर्षे भाजपची सत्ता होती. महापालिकेत भाजपचे 43 नगरसेवक होतं. परंतु महिला राखीव पदाचा कार्यकाळ संपल्याने पुढील अडीच वर्षांसाठी आज निवडणूक पार पडली. राष्ट्रवादीने यासाठी कंबर कसली होती. त्यातच भाजपचे सात नगरसेवक निवडणुकीआधी नॉट रिचेबल झाल्याने चुरस वाढली होती. चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे महापौरपदासाठी दिग्विजय सूर्यवंशी आणि भाजपचे धीरज सूर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. त्यात दिग्विजय सूर्यवंशी यांनी धीरज सूर्यवंशी यांचा तीन मतांनी पराभव केला. दिग्विजय सूर्यवंशी यांना 39 मते मिळाली तर धीरज सूर्यवंशी यांना 36 मते मिळाली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola