Sangli Flood Precautions | नदीकाठच्या 15 गावांना अत्याधुनिक बोटी, ब्रह्मनाळसारख्या घटनेच्या पार्श्वूमीवर खबरदारी
2019 सालच्या पुराचा अनुभव लक्षात घेता आणि यंदाच्या संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झालं आहे. मागील पुरात ब्रह्मनाळ गावात बोट बुडून अनेक लोकांचा जीव गेल्याची दुर्घटना घडली होती. यावेळी तशी घटना नदीकाठच्या कोणत्याही गावात घडू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नदी काठच्या 15 गावांना अत्याधुनिक पद्धतीच्या यांत्रिक बोटी देण्यात येत आहेत. कृष्णा नदी काठावर आज या बोटीचे प्रात्यक्षिक होईल आणि त्यानंतर 15 गावांना या बोटी सुपूर्त करण्यात येतील. या बोटीच्या रेस्क्यू ऑपरेशनचा कृष्णा नदी काठावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी.
Tags :
Flood Precautions Flood Management Sangli Satara Flood Sangli Food Disaster Disaster Management Flood Sangli Flood