Gopichand Padalkar : अहमदनगरच्या नामांतराचा विषय उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या दबावामुळे घेतला नाही
Continues below advertisement
अहमदनगरच्या नामांतराचा विषय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या दबावमुळे घेतला नसल्याचा गंभीर आरोप भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. मात्र राज्यात भाजपा सेनेचे सरकार आल्यानंतर अवघ्या 11 महिन्यात अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यानगर असं नामांतर या सरकारने करून दाखवलं याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह समस्त मंत्रिमंडळाचं पडळकर यांनी आभार मानले. तसेच सर्व अहिल्या प्रेमींनी पुढील एक महिना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करून महाराष्ट्र मध्ये एक ऊर्जा निर्माण करावी असे आवाहनही पडळकर यांनी यावेळी केला आहे.
Continues below advertisement