Eknath Shinde : म्हैसाळ पाणी योजनेच्या विस्तारित प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची तत्वत: मान्यता
Continues below advertisement
सांगलीतील जत तालुक्यातील त्या गावच्या पाण्याच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. म्हैसाळ पाणी योजनेच्या विस्तारित प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची तत्वत: मान्यता दिली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळं सुमारे दोन हजार कोटींच्या या प्रकल्पामुळे जतमधील 48 गावे ओलिताखाली येणार आहेत. सध्याच्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागातील आणि खासकरून सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित असलेल्या गावांच्या पाणी प्रश्नावर लक्ष घातले आहे. एक जानेवारीपासून याची निविदा प्रक्रियाही सुरू होणार आहे. तब्बल दोन हजार कोटीच्या या प्रकल्पामुळे जत मधील 48 गावे ओलिताखाली येणार आहेत.
Continues below advertisement