Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला, उद्यापासून काय असणार दर?
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला, उद्यापासून काय असणार दर?
समृद्धी महामार्गाच्या पथकरात उद्यापासून 19 टक्क्यांची वाढ.
पथकरात वाढ झाल्याने समृद्धी महामार्गाचा प्रवास महागणार.
नागपूर ते मुंबई असा ७०१ किलोमीटरचा समृद्धी महामार्ग जवळपास ६५ हजार कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आला. देशातील सर्वात लांब पल्ल्याचा द्रुतगती महामार्ग म्हणून हा ओळखण्यात येतो. ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण झालं. सध्या ७०१ पैकी ६२५ किलोमीटर चा महामार्ग हा वाहतुकीसाठी खुला आहे आणि ११ डिसेंबर २०२२ पासून या महामार्गावरील लागू असलेल्या पथकरात आता ०१ एप्रिल २०२५ पासून १९ टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरील प्रवास महागणार आहे.
समृद्धी महामार्गावरील जुन्या आणि नवीन वाढीव पथकरात किती वाढ झाली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून...
----------------------------वाहन प्रकार जुना पथकर नवीन पथकर
(रुपयांमध्ये)
हलकी वाहने 1081 1287
हलकी व्यावसायिक
वाहने 1743 2075
बस / ट्रक. 3656 4356
तीन एक्सेल 3987 4750
व्यवसायिक वाहन.
अवजड वाहन. 5737 6831
अति अवजड वाहन. 6981 8312
हा पथकर नागपूर तें इगतपुरी असा 625 किलोमीटरचा आहे.
----------------------------
२० मार्च रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने १९ टक्क्यांची पथकर वाढीची घोषणा केली असून उद्यापासून म्हणजे ०१ एप्रिल २०१५ पासून ही अमलात येणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आता 19 टक्क्यांची पथकर वाढीचा भुर्दंड भरावा लागणार आहे.