Samit Thakkar | आदित्य ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्वीट करणारासमीत ठक्कर मुंबई पोलिसांच्या ताब्यात
नागपूर : ट्वीटरवर मंत्री आदित्य ठाकरे यांना पेंग्विन तर ठाकरे सरकारला औरंगजेब आणि पॉवरलेस सरकार म्हणणाऱ्या समीत ठक्करला नागपूरच्या सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर होताच मुंबई पोलिसांनी मुंबईच्या प्रकरणात समीतला ताब्यात घेतले. दुरांतो एक्प्रेसने मुंबई पोलीस समीत ठक्करला घेऊन निघणार आहे. उद्या सकाळी ते मुंबईला पोहोचणार आहे.