Ashok Chavan | मुस्लिमांच्या आग्रहाखातर काँग्रेस सत्तेत असल्याच्या चव्हाणांच्या वक्तव्यावर भाजपची टीका

मुस्लिमांच्या आग्रहामुळे आणि भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्याच्या अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर आज भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला. चव्हाणांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षाचं खरं रुप देशासमोर आल्याचं संबित पात्रा यांनी म्हटलं आहे.

शिवाय काँग्रेस म्हणजे मुस्लिम लीग असल्याचा आरोपही त्यांनी केला. कॉलेजमधील मुलांना भडकवत असल्याचा आरोप करत  सोनिया गांधी आणि शरद पवारांनी देशाची माफी मागावी अशीही मागणी पात्रांनी केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola