Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर प्रथमच सलील देशमुख कॅमेऱ्यासमोर   ABP MAJHA

Continues below advertisement

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र आणि नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्य सलील देशमुख यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे... नागपूर ग्रामीण तहसील या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र उभारण्यात आले असून त्या ठिकाणी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास सलील देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर जिल्हा परिषद सदस्य सोबत आले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला... विशेष म्हणजे अनिल देशमुख यांच्या राजीनाम्या पासूनच अनिल देशमुख यांचं संपूर्ण देशमुख कुटुंब सार्वजनिक ठिकाणी दिसून येत नव्हतं.. जिल्हा परिषदेचे सदस्य असूनही सलील देशमुख ही कोणाला भेटत नव्हते, प्रसारमाध्यमांच्या कॅमेरासमोर येत नव्हते... मात्र आज ते मतदानाचा हक्क बजवायला आवर्जून आले... यावेळी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता कॅमेरासमोर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही असं त्यांनी सांगितलं... मला लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा आणि कर्तव्याचा मी पालन केलं असं ते व्यक्तिशः बोलताना म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram