Sajad Ahmad Saved Tourist | Pahalgam पाठीवर घेऊन प्राण वाचवले स्थानिकाच्या डोळ्यासमोर काय काय घडलं?

Sajad Ahmad Saved Tourist | Pahalgam पाठीवर घेऊन प्राण वाचवले स्थानिकाच्या डोळ्यासमोर काय काय घडलं?

हे ही वाचा..

काश्मीरच्या पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा बळी गेल्यानंतर दिल्लीत सरकारी स्तरावर वेगवान घडामोडी सुरु आहेत. दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन पर्यटकांचा जीव घेतला होता. हा गेल्या काही वर्षांमधील मोठा दहशतवादी हल्ला आहे. निष्पाप भारतीयांचे बळी गेल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पहलगाम दहशतवादी हल्ला (Pahalgam Attack) करणाऱ्यांना आणि यामागील सूत्रधारांना आम्ही सोडणार नाही, अशा इशारा दिला होता. आम्ही त्यांच्या कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर शिक्षा त्यांना देऊ. या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी त्यांना शोधून आम्ही शिक्षा करु, असे मोदींनी म्हटले होते. तत्पूर्वी भारताने 1960 साली पाकिस्तानसोबत असलेला सिंधू जल करार (Indus Water Treaty) रद्द करुन पाकिस्तानला मोठा धक्का दिला होता. यानंतर आता मोदी सरकार आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकारकडून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील असलेली शस्त्रसंधी (Ceasefire) रद्द करण्यासंदर्भात विचार सुरु आहे. मोदी सरकारचे हे पाऊल युद्धाच्या जवळ जाणारे ठरु शकते. त्यामुळे आता दिल्लीत नेमका काय निर्णय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola