Sadabhau Khot | राजू शेट्टी नव्हे, काजू शेट्टी, शेट्टी भंपक व्यक्ती सदाभाऊ खोत यांची खालच्या भाषेत टीका
एकीकडे दूध दरावरून राज्यात आंदोलन पेटले असताना दुसरीकडे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात टोकाचे शाब्दिक युद्ध रंगले आहे. राजू शेट्टी म्हणजे काजू शेट्टी असून या भंपक माणसाला शेतकऱ्यांनी देवाला सोडलेल्या वळू सारखी अवस्था झाल्याची घणाघात टीका माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राज्य शेट्टी यांच्यावर केली आहे. सांगलीच्या आटपाडीत सदाभाऊ पत्रकारांशी बोलत होते.