
Sachin Tendulkar at Tadoba | सचिन तेंडुलकरची ताडोबा सफर, वाघांचे दर्शन आणि अनुभवाचं वर्णन!
Continues below advertisement
चंद्रपूर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सचिनने पोस्ट केलेला व्हिडीओ क्रिकेटचा नसून ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आहे.
सलग दोन वर्षांपासून सचिन ताडोबाला जात आहे आणि यावर्षी 24 ते 27 जानेवारी दरम्यान चार दिवस ताडोबा येथे मुक्कामी होता. या दरम्यान घेतलेल्या अनुभवाचा व्हिडिओ त्याने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 4 मिनिट 42 सेकंदांचा हा व्हिडीओ आहे. ज्यात सफारी करताना झालेले वाघांचे दर्शन आणि या अनुभवाचे वर्णन करताना सचिन दिसत आहे.
Continues below advertisement
Tags :
Tadoba Safari Lion Safari Tadoba Tiger Safari Master Blaster Tadoba Viral Video Sachin Tendulkar