Russo Ukrainian War : युक्रेनच्या राजधानीसह अनेक शहरात बॉम्बहल्ले, पुतीन यांचा युक्रेनला इशारा
Continues below advertisement
गेले काही दिवसांपासून ज्याची भीती होती... त्या युद्धाला सुरुवात झालेय. रशियानं युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केलेय. युक्रेनच्या डॉनबास प्रांतात स्पेशल ऑपरेशन करण्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी आदेश दिले आहेत. आणि या आदेशानंतर युक्रेनमधील अनेक शहरात मोठे बॉम्बहल्ले झाले आहेत. राधानी कीवमध्येही मोठे बॉम्बहल्ले झाल्यानचं कळतंय. रशियानं घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानं मात्र जग धास्तावलंय. युक्रेनमध्ये आणीबाणी लागू करण्यात आलेय. युक्रेनमधील सर्व विमानतळही बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. सध्या युरोपातील ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स या देशांसह अमेरकेनंही युक्रेनला पाठिंबा दिलाय. जसंच जगभरातून रशियावर निर्बंधही घालण्यात आलेयत मात्र या कशालाही न जुमानता रशियानं युद्धाचं रणशिंग फुंकलंय.
Continues below advertisement