Dhule NCP Fight : अनिल गोटेंचा फोटो बॅनरवर नसल्यानं रोहित पवार - अनिल गोटेंचे कार्यकर्ते भिडले
Continues below advertisement
धुळे जिल्हा राष्ट्रवादी पक्षांमध्ये दोन गट असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी जयंत पाटील यांच्या दौऱ्यावेळी कार्यकर्ते समोरासमोर भिडले होते, याच घटनेची पुनरावृत्ती आज आमदार रोहित पवार हे धुळे दौऱ्यावर आले असताना पाहायला मिळाली. आमदार रोहित पवार हे धुळे दौऱ्यावर धावती भेट देण्यासाठी आले होते यावेळी त्यांचे शहरातील पारोळा चौफुली परिसरात स्वागत करण्यात आले. आमदार रोहित पवार यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर अनिल गोटे यांचा फोटो नसल्याच्या कारणावरून त्यांचे कार्यकर्ते प्रशांत भदाणे आणि राष्ट्रवादी युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार यांच्यात वाद सुरू झाला. यावेळी प्रशांत भदाणे आणि कुणाल पवार हे समोरासमोर एकमेकांना भिडले. दरम्यान या घटनेमुळे राष्ट्रवादी युवक आघाडी मधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
Continues below advertisement