#BirdFlu लातूरच्या केंद्रेवाडीमध्ये 400 कोंबड्या मृत्यूमुखी,ठाणे,बीड,नागपुरात शेकडो पक्षी मृतावस्थेत

Continues below advertisement

चिकनचे दर 180 रूपये होते ते 160 झाले आहेत. जिवंत कोंबडीची विक्री किंमत 98 रूपये होती आज 87 रूपये झाली आहे. महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यू नसताना हे असे का असे का असा प्रश्न पोल्ट्री व्यावसायीकांना पडला आहे.. कोरोना काळात चिकन आणि अंड्यांच्या घटलेल्या मागणीमुळे 2020 च्या पहिल्या सहामाहीत तोटा सहन केल्यानंतर कुक्कुटपालन उद्योग दुसऱ्या सहामाहीत आला आला होता तोच बर्ड फ्लूच्या घटनांनी पुन्हा एकदा कुक्कुट पालन व्यवसायाची धास्ती वाढली आहे. कोंबड्यांत बर्ड फ्लूची लक्षणे न दिसल्यानंतरही दोन दिवसांत ठोक बाजारात चिकन आणि अंड्याच्या किमतीत 10% घसरण आली आहे. बर्ड फ्लूची प्रकरणे वाढल्यास पुन्हा एकदा चिकन आणि अंड्यांची मागणी घटेल आणि उद्योगाला नुकसान सोसावे लागू शकते, अशी भीती व्यावसायिकांना आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram