Retired Police On RSS HQ attack:1 जून 2006 ला संघ मुख्यालयावरील हल्ला परतवणाऱ्या पोलिसांची उपेक्षा
Retired Police On RSS HQ attack:1 जून 2006 ला संघ मुख्यालयावरील हल्ला परतवणाऱ्या पोलिसांची उपेक्षा
दहशतवादी हल्ल्याला अपयशी करून दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं गेलं, तर नागरिकांकडून मोठा जल्लोष केला जातो, तत्कालीन सरकारकडून श्रेय घेतला जातो, प्रसंगी विरोधक राजकारण ही करतात.. मात्र, स्वतःचा जीव धोक्यात घालून शौर्य गाजवणारे आणि दहशतवाद्यांना ठार मारणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनेनंतर दुर्लक्षित राहत असेल, तर तुम्ही काय म्हणणार... असेच काही घडले आहे नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर हल्ला चढवणाऱ्या दहशतवाद्यांना यमसदनी धाडून संघ मुख्यालय आणि नागपूरकरांची सुरक्षा सुनिश्चित करणाऱ्या पोलीस टीम सोबत... 1 जून 2006 च्या पहाटे नागपूरातील संघ मुख्यालयाजवळ दहशतवादी आणि नागपूर पोलिसांमध्ये चकमक झाली होती.. शेकडो गोळ्या चालल्या होत्या, हॅन्डग्रेनेटचा वापरही झाला होता.. अत्याधुनिक हत्याराणी सुसज्ज दहशतवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या त्या पोलिस टीमला तत्कालीन सरकारकडून शौर्य पुरस्कार, मेडल आणि वन स्टेप प्रमोशन म्हणजेच पदोन्नतीची घोषणा करण्यात आली होती... मात्र दुर्दैव म्हणजे पोलिस निरीक्षक राजेंद्र तिवारी त्यांच्यासोबतचे पोलीस उपनिरीक्षक अरविंद सराफ आणि मिथिलेश त्रिपाठी हे सर्व अनेक वर्षांपूर्वी सेवानिवृत्त सुद्धा झाले, मात्र महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेले वन स्टेप प्रमोशन किंवा शौर्य पुरस्कार आणि मेडल तर सोडाच एक साधा कागदी प्रमाणपत्र सुद्धा संघ मुख्यालयावरील दहशतवादी हल्ला थोपवून धरणाऱ्या या पोलीस टीमला मिळालेला नाही... त्यामुळे या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी शहीद झाल्यानंतरच पोलिसांच्या शौर्याची दखल घेतली जाते का?? असा जळजळीत प्रश्न सरकारला विचारला आहे... आम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून दहशतवाद्यांशी लढलो, नागपूरची सुरक्षा केली याचा समाधान आहे कारण आम्ही आमचा पोलिसी कर्तव्य नीट बजावले.. मात्र, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि सरकार आपलं कर्तव्य बजावण्यात यशस्वी ठरले नसल्याची खंत या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.. संघ मुख्यालयावरील दहशतवादी हल्ला थोपवत पाक आपण पुरस्कृत दहशतवाद्यांना कंठस्थान घालणाऱ्या शूर पोलीस टीमने एकत्रित येत एबीपी माझाशी खास संवाद साधला आहे..