BMC Commissioner | मुंबई महापालिकेसाठी दोन आयुक्त हवेत, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी

Continues below advertisement
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा होणारा विस्तार व वाढणारी लोकसंख्या पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त असणं गरजेचे आहे, अशी मागणी मंत्री स्लम शेख यांनी नगर विकास विभागाकडे केली आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून देशातील विविध भागांतून लोक रोजीरोटीच्या शोधात मुंबई शहरात येत असतात. याचाच परिणाम म्हणून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही त्या शहरातील महानगरपालिकेची असते. परंतु सध्या महानगरपालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरीकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहतात, असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram