Republic Day Parade Kartavya Path : कर्तव्यपथावर विविध राज्यांच्या चित्ररथांचा देखावा, डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण

Republic Day Parade Kartavya Path : कर्तव्यपथावर विविध राज्यांच्या चित्ररथांचा देखावा, डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण

झारखंड

कर्तव्यपथावर झारखंडचा चित्ररथ सहभागी झाला.
वारसा आणि विकासाची परंपरा अशी झारखंडची यंदाची थीम होती. 
चित्ररथातून रतन टाटांनाही श्रद्धांजली देण्यात आली. 

आंध्र प्रदेश

पर्यावरणपूरक लाकडाच्या खेळण्यांवर आधारित यंदा गुजरातचा चित्ररथ होता.
या खेळण्यांसाठी नैसर्गिक रंगांचाही वापर करण्यात आला. 

पंजाब

कृषीप्रधान पंजाब राज्याचं दर्शन यंदाच्या चित्ररथातून झालं. समृद्ध संगीत परंपरा आणि फुलकारी या हस्तकलेचंही प्रदर्शन पंजाबच्या चित्ररथातून पाहायला मिळालं. 

उत्तर प्रदेश

महाकुंभ २०२५ चा देखावा साकारला, महाकुंभच्या सांस्कृतिक परंपरेचं दर्शन, अमृत कलशाची प्रतिकृती साकरण्यात आली तर समुद्रमंथनाच्या कथेचाही समावेश करण्यात आला. 

बिहार

समृद्ध ज्ञान आणि शांतीची परंपरेचं बिहारच्या चित्ररथातून दर्शन झालं. बोधी वृक्ष, बुद्धांचं धम्मचक्र, प्राचीन नालंदा विद्यालय, भित्तीचित्रांमधून बिहारच्या संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं. 

मध्य प्रदेश

७० वर्षांनंतर कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ते दाखल झाल्याचं यंदाच्या चित्ररथात प्रदर्शन, जैव विविधता, चित्त्यांच्या संरक्षणाचा संदेश देण्यात आला. चित्ररथावर कलाकारांकडून लहंगी नृत्याचं सादरीकरण करण्यात आलं.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola