Rahul Gandhi | शेतकऱ्यांना नको असलेले कृषी कायदे कायमचे स्थगित करा, राहुल गांधींची मागणी

Continues below advertisement

नवी दिल्ली: मोदी सरकार दोन वर्षे कृषी कायद्याला स्थगिती देणार होते, ती स्थगिती त्यांनी कायमची द्यावी आणि त्यासाठी आम्ही मदत करु असे काँग्रेस नेता राहुल गांधी म्हणाले. ते दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन आणि दिल्लीत झालेला हिंसाचार यावर बोलताना राहुल गांधी मोदी सरकारला उद्देशून म्हणाले की, "तुम्ही दोन वर्षे कृषी कायदे स्थगित करणार होता, ते कायमचे स्थगित करा. वाटल्यास पुन्हा प्रयत्न करा. त्यासाठी आम्ही मदत करु. शेतकऱ्यांशी यावर चर्चा करा, सर्वांशी चर्चा करा. कृषी क्षेत्राला सुधारणांची गरज आहे हे तर आम्ही पण मान्य करतो."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram