#COVIDVaccination कोरोना लसीकरण प्रमाणपत्रांवरून मोदींचा फोटो हटवा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश
Continues below advertisement
नवी दिल्ली: ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत त्या राज्यातील कोरोना सर्टिफिकेटवरचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकावा असा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. तशा स्वरुपाचे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य खात्याला लिहिले आहे. सध्या पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या राज्यात आणि पद्दुचेरीमध्ये विधानसभा निवडणुकांची आचार संहिता सुरु आहे.
Continues below advertisement