पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांसमोर बंडखोरांचे आव्हान! आघाडीतील नाराजी पुन्हा समोर
Continues below advertisement
मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज जवळपास सर्वच पक्षांनी आपआपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. अर्ज भरताना महाविकास आघाडीत पुन्हा एकदा नाराजी दिसून आली. तर जवळपास सर्वच पक्षांसमोर बंडोखोरांचे आव्हान कायम असल्याचे दिसून आले आहे.
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला तर शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसच्या जयंत आससगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीचे नेते पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सतेज पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील नेते यावेळी उपस्थित होते.
Continues below advertisement