Vinayak Raut : शशिकांत वारिसे मृत्यूप्रकरणी Pandharinath Amberkar यांची NARCO Test करा

Continues below advertisement

Ratnagiri News :  रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर (Rajapur Taluka) तालुक्यातील 'महानगरी टाईम्स' (Mahanagari Times) या वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) यांचा आज सकाळी उपचारादरम्यान अपघाती मृत्यू झाला आहे. राजापूर येथील पेट्रोल पंपावर त्यांना थार गाडीनं जोरात धडक दिली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रत्नागिरीहून कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा आज सकाळी 7.30 वाजता मृत्यू झाला आहे. शशिकांत वारिसे यांचा हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप रिफायनरीविरोधी संघटनेने केला आहे. रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणात आता कार चालक पंढरीनाथ आंबेरकर याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram