Barsu refinery Protest: बारसू आंदाेलनाला शिवसेनेची पूर्ण ताकद- उद्धव ठाकरे

Continues below advertisement

महाडमध्ये उद्धव ठाकरे सभा घेणार असले तरी, सभेआधी त्यांनी बारसू येथे जाऊन प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली आणि आंदोलनाला पूर्ण ताकद देण्याची ग्वाही दिली. त्याचसोबत, उद्धव ठाकरे यांनी बारसूजवळच्या कातळशिल्पांची पाहणी केली. ग्रीन रिफायनरीमुळे युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होणारी कातळशिल्प नामशेष होणार असल्याची भीती व्यक्त करत, हा प्राचिन ठेवा जपण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. इतकंच नाही तर, तर ही कातळशिल्पे धोक्यात असल्याची माहिती... आत्ताच आपल्याला मिळाल्याने, ही शिल्पे वाचवण्यासाठी आपण युनेस्कोला पत्रही लिहिल्याची आठवण त्यांनी करुन दिली... दरम्यान, कोकणातल्या भूमीपुत्रांवर अन्याय होत असेल, तर प्रकल्पाला आपला विरोधच असेल, या भूमिकेचा पुनरुच्चार करत, बारसू प्रकल्पाचा वाद आणखी तापण्याचे संकेत त्यांनी दिलेत... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram