Uddhav Thackeray Rajapur Speech : अब की बार भाजप तडीपार! मी पंतप्रधानांना नाही, तेच मला शत्रू मानतात
abp majha web team
Updated at:
05 Feb 2024 01:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray Speech : रायगड मधल्या मुस्लिम बांधवांनी आम्हाला मराठीतील कुराण दिले, त्यांना आपले हिंदुत्व कळलं आहे. राजनला धन्यवाद आणि त्याची पाठ थोपटायला आलोय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांना मी अद्याप शत्रू मानत नाही, पण ते मला शत्रू मानतात, कारण त्यांनी शिवसेना चोरली, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधानांवर (PM Modi) केला आहे. 'देशभरात यांच्या कारभाराचे चटके बसतायत. आमचं हिंदुत्व धर्माधर्मात आग लावणारं नाही. शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत कशी लावता असा सवालही उद्धव ठाकरे यांनी एसीबी अधिकाऱ्यांना विचारला आहे. कारण त्यांचे दिवस फिरले तसे तुमचेही फिरतील', असंही त्यांनी म्हटलं आहे.