ABP News

Rohan Bane Profile : Chiplun मध्ये ठाकरेंचा नवा शिलेदार, रोहन बनेंची मतदारसंघात ताकद किती?

Continues below advertisement

Rohan Bane Profile : Chiplun मध्ये ठाकरेंचा नवा शिलेदार, रोहन बनेंची मतदारसंघात ताकद किती?

रत्नागिरी : विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्यानंतर आता हालचाली देखील वाढताना दिसत आहेत. बालेकिल्ला असलेल्या कोकणात (Konkan) आता ठाकरे गटाने चाचपणी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीमध्ये झालेल्या दुहीनंतर अजित पवार यांना पाठिंबा दिलेल्या आमदार शेखर निकम (Shekhar Nikam) यांच्याविरोधात उमेदवार निश्चितीवर भर सध्या ठाकरे देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेल्या रोहन बने यांना पक्षाने कामाला लागा असे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. शांत आणि संयमी अशी ओळख रोहन बने (Rohan Bane) यांची आहे. त्यामुळे शेखर निकमांसारख्या उमेदवाराविरोधात बनेंना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. रोहन बने हे माजी आमदार सुभाष बने यांचे ज्येष्ठ पुत्र देखील आहेत. शिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जिल्हाभरात राहिलेला चांगला संपर्क, अध्यक्षपदाचा कारकिर्दीत घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय, तसेच तरूण आणि वादात नसलेलं व्यक्तिमत्व म्हणून रोहन बने यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळेच रोहन बने यांना चिपळूण-संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यास मोठी अडचण येणार नाही असं रत्नागिरी जिल्ह्यातील जाणकारांचं म्हणणं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram