Ratnagiri जिल्ह्यातील राजापुरात Refinery प्रकल्पाच्या समर्थनासाठी एल्गार मेळाव्याचं आयोजन :ABP Majha

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुरात रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. राजापूर शहरातील धोपेश्वर इथं रिफायनरी प्रकल्पासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलंय. रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी १५ हून अधिक ग्रामपंचायतींच्या सरपंचानी हजेरी लावलीय. विशेष म्हणजे या प्रकल्पाला विरोध दर्शवणाऱ्या शिवसेनेच्या विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांनीही समर्थन मेळाव्याला हजेरी लावलीय. राष्ट्रवादी, भाजप, आणि काँग्रेसचे पदाधिकारी या मेळाव्याच्या मंचावर हजर आहेत. बारसू, सोलगाव, धोपेश्वर या गावात रिफायनरी प्रकल्पासाठी चाचपणी सुरू आहे..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola