Ratnagiri : सरकारकडून दिली जाणारी शिधा वेळेत मिळाली नाही, रत्नागिरीत लोकांच्या प्रतिक्रिया

Continues below advertisement

सरकारकडून दिली जाणारी  शिधा वेळेत मिळाली असती तर उपयोग झाला असता. आता त्याचा काय उपयोग? आमचा फराळ बनवून देखील झाला. अशी प्रतिक्रिया आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या गृहिणींची. कारण सरकारकडून दिला जाणारा शिधा अद्याप देखील उपलब्ध झालेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 2 लाख 75 हजार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 लाख 63 हजार किटची गरज आहे. पण अद्याप देखील सर्व वस्तू उपलब्ध नाहीत. त्यामुळे रेशन दुकानावरती शिधा मिळणार नाही. त्यामुळे आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गृहिणी आपली नाराजी व्यक्त करत आहेत. दिवाळी अगदी दोन दिवसांवरती आली. पण सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता नाही अशी भावना या गृहिणीने व्यक्त केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram