Ratnagiri Sheti Farming Video : कोकणात पावसाची दमदार हजेरी, पेरणीच्या कामांना वेग

कोकणात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर आता पेरणीच्या कामांना वेग आलाय... दरम्यान कोकणातल्या शेतीच्या बांधावरून आढावा घेतला आहे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी 

कोकणात पाऊस पडतोय आणि त्यामुळे शेतीची कामं सुरू झाली आहेत. सध्या शेतकऱ्यांचे हात शेतीत राबताना दिसून येत आहेत. दरम्यान पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या या शेतीला सध्या आधुनिक तंत्रज्ञानाची किंवा यंत्रांची मदत घेतली जात आहे. भातशेतीसाठी नांगरणी, उकळ करत असताना सध्या मशीन वापरल्या जात आहेत. कोकणातून होणारे स्थलांतर, त्यामुळे मनुष्यबळाची भासणारी कमी यासारखी कारणे सध्या यामागे असल्याचं शेतकरी सांगतात. 

दुसरीकडे 

अमरावतीत पावसाची दमदार हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. पाऊस आल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आता दमदार पावसाची प्रतीक्षा.

मराठवाड्यात दमदार पाऊस, बीडमधील लेंडी नदीला पूर तर जालन्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरुप, लातुरात पर्यायी रस्ता वाहून गेल्याने लातूर-उदगीर मार्ग बंद

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola